आज एक व्हाट्सऍप खूप फिरतो आहे की मी भाड्याच्या घरात रहायचो. मग मी मालकाला शेअर बाजाराविषयी सांगितले. आज आम्ही दोघे भाड्याच्या घरात रहतो.
त्याच लघु कथेचा प्रॅक्टिकल भाग २
पूर्वी मी भाड्याच्या घरात रहायचो. २०१२ साली, माझ्याकडे ८५ लाख रुपये बँकेत होते. माझा मित्र अनिल कडे सुद्धा ८५ लाख रुपये आले होते. त्याने बाणेर येथे मस्त ३ बीएचके फ्लॅट घेतला. मी A3S Financial Solutions यांचा सल्ला घेतला आणि माझे पैसे म्युच्युअल फंडाच्या ४ डायव्हर्सिफाइड योजनांमध्ये गुंतवले आणि अनिल च्या नवीन फ्लॅट मध्ये भाड्याने रहायला गेलो. आज माझ्याकडे १७ टक्क्याने ४.१० कोटी रुपये आहेत. भाड्याचे २४ लाख रुपये वजा केले तर ३.८६ कोटी. अनिल च्या फ्लॅट ची किंमत आज १.१० कोटी आहे. त्याला भाड्याचे २४ लाख मिळाले. त्याने १० लाख रुपये मेन्टेनन्स, कॉर्पोरेशन टॅक्स आणि इन्कम टॅक्स दिला. नेट त्याच्याकडे १.२४ कोटी रुपये आहेत. मी आज असे २ फ्लॅट विकत घेऊ शकतो. आज मला ,आत्ताच्याच भाड्यामध्ये, बाजूच्याच नवीन इमारतीमध्ये ४ बीएचके भाड्याने मिळतो आहे. परंतु, अनिल माझे भाडे कमी करायला तयार आहे व मला सुद्धा मित्राला अडचणीत आणायचे नाही. मी माझ्या मित्राच्या घरात आणि म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीत सुखी आहे